ती मैत्री असते जिथे प्रेम जडते भावनेचे ……………….
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
◻️♦️नसते शब्दाची सांगड
नसते नात्याची गुंफण
हृदयाचा भाव जुळतो
तेथे फुलते मैत्रीचे अंगण.
◻️♦️नसते रोजचे बोलणे
नसते रोजचे भेटणे
मी आठवताच फकत
उचकी तुला लागणे.
◻️♦️नसतो रोजचा प्रवास
नसतो रोजचा सहवास
फक्त जाणवतो स्पर्श
आणि बसतो विश्वास.
◻️♦️कधी नाही होत ठरवून
कधी नाही येत चालत
तारुण्याच्या निसर्गात
मैत्री अलगद येते उमलत.
♦️◻️निःशब्द भावना जिथे
दुरूनही जाणते
दुर असूनही नेहमी
जवळच भासते.
♦️◻️ती फक्त मैत्री असते
जिथे प्रेम जडते भावनेचे
जुळते आपुलकीचे धागे
स्नेहबंध अतूट मायेचे.
🔸🏵️🔸वैशाली राऊत, सहज सुचलं सदस्य नागपूर.
