Home Breaking News Bhadrawati taluka@news यशवंतराव शेंदे विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण…

Bhadrawati taluka@news यशवंतराव शेंदे विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण…

326

Bhadrawati taluka@news
यशवंतराव शेंदे विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण…

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधि,भद्रावती.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ संगीताताई येडमे, मोहम्मद कुरेशी, सौ.नंदा ठाकूर, सर्वदाताई पवार,सतीश पूरी यावेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून झाली.
या कार्यक्रमात एकूण ११२ मुलामुलींना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यासाठी स्व.श्रीनीवासराव शिंदे मेमोरियल,रविंद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट तथा यशवंतराव शिंदे विद्यालयातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. यावेळी विद्यालयात मुलांना मिळणाऱ्या मदतीबद्दल तथा इतरही मार्गदर्शनासाठी पालकांनी शाळेचं कौतुक केलं. या विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शना सोबत होत करू मुलांना मदतीचा हातही इथला शिक्षक पुढे करतो,असं सांगत पालकांनी शिक्षकांची पाठ थोपटली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे सरांनी पालक आणि शिक्षक हे दोघेही विद्यार्थ्यांचा विकास साधणारे घटक आहेत असं सांगितलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
स.एम.देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदनवार यांनी
मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुहास कोल्हे ,उमेश पाटील, विजय लांबट , रविंद्र बनकर, सय्यद मॅडम यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.