Home Breaking News Bhadrawati taluka@news भद्रावती रोटरी क्लब अनेक पुरस्काराने सन्मानित.

Bhadrawati taluka@news भद्रावती रोटरी क्लब अनेक पुरस्काराने सन्मानित.

297

Bhadrawati taluka@news
भद्रावती रोटरी क्लब अनेक पुरस्काराने सन्मानित.

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती.

भद्रावती – गांधी सिटी वर्धा येथे रोटरी क्लब तर्फे जिल्हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . 2022 -23 या रोटरी वर्षाकरिता अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद , सचिव रोटे अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि इतर रोटरीयन्स यांच्या संकल्पनेतून अनेक कार्यक्रम राबविण्यात आले . त्या अनुषंगाने रोटरी क्लब भद्रावतीला रोटरी 3030 तर्फे मेंबरशिप ग्रोथ अवार्ड, 100% मेंबर द रोटरी फाउंडेशन फंड अवार्ड , बेस्ट पब्लिक रिलेशन अवार्ड, मेंबरशिप डेव्हलपमेंट अवॉर्ड , लोकांच्या जीवनात रोटरीची कल्पना करण्यात मदत करण्यासाठी रोटरी रिटाशन अवार्ड, फेलोसेपी अवॉर्ड , तसेच रोटरी क्लब भद्रावतीचे पास्ट प्रेसिडेंट रोटे भाविक तेलंग यांना डिस्ट्रिक्ट ग्रीटिंग चेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे डॉ. आनंद झुनझुनवाला , पीडीजी महेश मोकलकर, रोटे पात्रीकर सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यामध्ये कोषाध्यक्ष 2022 23 रोटे सुधीर पारधी, विवेक आकोजवार , विनोद कांमडी , किशोर खंडाळकर, विक्रांत बिसेन , सुनील पोटदुखे , किशोर भोसकर, प्रकाश पिंपळकर, सुरेंद्र राऊत , वसंत उंमरे , डॉ. अमित प्रेमचंद व रोटे रुकसाना शेख उपस्थित होते.