Gadchiroli dist@ news
• सुरजागड खाणीत भीषण अपघात – एक अभियंता व अन्य दोन ठार !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या खाणीत मोठा अपघात घडल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर क्षणात आदळले.दरम्यान या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.घटनेचे वृत्त माहिती होताच त्या ठिकाणी काही काळ
तणाव परिस्थिती निर्माण झाली होती. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती .त्यामुळे या परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एटापल्ली ते आलापल्ली आणि आलापल्ली ते आष्टी हा मार्ग या कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या वाहनांमुळे या मार्गावर अनेकांचे जीव गेलेले आहेत.
त्या विरोधात अनेक आंदोलन करून देखील जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या उदासिनते मुळेच अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, असा आरोप करत मजुरांनी या वेळी निदर्शने केली होती.
