Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटेपटू चमकले
सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)
बल्लारपूर:- नुकत्याच घेण्यात आलेल्या कर्नाटक शिवमोगा येथे चौथी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शहरातील कराटे पटू चमकले.
कर्नाटक शिवमोगा येथे चौथी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती त्यात बल्लारपूर येथील नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लब चे कराटे पटू यांनी उत्तमरित्या खेळून पदक प्राप्त केले.
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा मध्ये एकूण 14 देश सहभागी झाले होते त्यात यू एस ए, नेपाल ,भूटान, श्रीलंका, बांगलादेश, दुबई, इंडोनेशिया ,केनेडा, रशिया, थाईलैंड, चीन,कोरिया ,जापान व अफगाणिस्तान चे खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये भारताकडून बल्लारपूर शहरातील नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लब चे कराटे पटू यांनी बाजी जिंकली. यात साईप्रणित स्वामी डोड्डीपेल्लीवार याने वयोगट 16 वर्ष खालील काता व कुमिते मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले, यश भैय्यालाल कोरे यांनी काता मध्ये सिल्वर मेडल व कुमिते मध्ये ब्रांन्स मेडल प्राप्त केले असून हा विद्यार्थी दिलासाग्राम स्कूल बल्लारपूर चा आहे.
राष्टसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली,भास्कर संजय घुग्लोत 16 वर्षा खालील काता मध्ये ब्रांन्स मेडल व कुमिते मध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. कराटे प्रशिक्षक सुनिल विजय कांबळे यांनी सुद्धा वयोगट 40 वर्षांमध्ये काता मध्ये सिल्वर मेडल प्राप्त करून बल्लारपूर शहर व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.
याचे श्रेय दिलासाग्राम स्कूल चे प्रिन्सिपल सिस्टर विनया व व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर फुलकुमारी , नालंदा क्रीडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर उपक्रम संस्कार व्यायाम शाळेचे अध्यक्ष समीर केने व उपाध्यक्ष मनीष पांडे व स्पर्धक चे आई वडील व कराटे प्रशिक्षक सुनील विजय कांबळे, आकाश दुर्गे व सांस्कृतिक विचार मंच यांना दिले आहे.
