Ballarpur city@ news
• आम आदमी पार्टीच्या नियुक्ती पत्र वितरण सोहळा
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर:- बल्लारपुर शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ति पत्र वितरण सोहळा घेण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला, युथ आघाडी व टेकड़ी, डेपो व वस्ती विभाग समितीची घोषणा करण्यात आली तसेच बल्लारपुर शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्या माध्यमातून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कार्यप्रणाली सांगून जबाबदारी देण्यात आली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचे स्वागत देखील करण्यात आले. माजी जिलाध्यक्ष सुनील मुसळे, संघटन मंत्री भिवराज सोनी व प्रा. नागेश्वर गंडलेवार व कोषाध्यक्ष सरफराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी माजी जिलाध्यक्ष ॲड. सुनील मुसळे आणि नवनियुक्त जिलाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आम आदमी पार्टी बल्लारपुर चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
