Home Breaking News Chandrapur dist@ news • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाॅईक रॅलीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष!...

Chandrapur dist@ news • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाॅईक रॅलीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष! •विविध मागण्यांसाठी काढली कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली;हजारों कर्मचाऱ्यांचा रॅलीत सहभाग!

244

Chandrapur dist@ news
• राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाॅईक रॅलीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष!

•विविध मागण्यांसाठी काढली कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली;हजारों कर्मचाऱ्यांचा रॅलीत सहभाग!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासनाचे मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांनी आज बुधवार दि. 09 ऑगस्टला हजारोंच्या संख्येने प्रलंबित मागण्यासंदर्भात जोरदार निदर्शने देत रस्त्याच्या मुख्य मार्गाने राज्यव्यापी भव्य बाईक रॅली काढली.या रॅलीने चंद्रपूरकरांचे आज अक्षरशा लक्ष वेधले.

पी. एफ. आर. डी.ए. कायदा रद्द करा, जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा, कंत्राटी पध्दत बंद करा व सर्व रिक्त पदे भरा, किमान वेतन रु.28000/- करा, भारतीय दंड संहिता 253 ही कलम रद्द करु नये, कामगार विरोधी कायदे रद्द करा आदी मागण्यांच्या संदर्भात या राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सदरहु बाईक रॅली दुपारी 1.30 वाजता सुरु होवून न्यु इंग्लिश हायस्कुल ग्राउंड ते गांधी चौक-जुटपुरा गेट-जनता कॉलेज-बंगाली कॅम्प व त्या नंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचली .

त्याठीकाणी जोरदार निदर्शने देवून मागण्यांसदर्भात सभा घेण्यात आली. या वेळी विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिंगलदिप कुमरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष राजु धांडे यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

आयोजित सभेचे सुत्रसंचालन अविनाश बोरगमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत कोतपल्लीवार यांनी केले.

आज चंद्रपूरात निघालेल्या बाईक रॅलीत जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी,यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.बाईक रॅलीच्या यशस्वीसाठी श्रीकांत येवले, अतुल किनेकर व संदीप गणफाडे यांनी अथक परिश्रम घेतले.