Home Breaking News Chandrapur city@ news • एलआयसी अभिकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम थाटात पार पडला !

Chandrapur city@ news • एलआयसी अभिकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम थाटात पार पडला !

142

Chandrapur city@ news
• एलआयसी अभिकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम थाटात पार पडला !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:भारतीय जीवन विमा निगम शाखा चंद्रपूर 1- 975 येथे कार्यरत कर्तव्यदक्ष विकास अधिकारी धनंजय पुराणिक यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या एलआयसी अभिकर्त्यांचा वार्षिक कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा नुकताच थाटात पार पडला.सदरहु कार्यक्रमाचे आयोजन आगर झरी येथील बटरफ्लाय गार्डनच्या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले होते.
वर्षभर जनतेला विम्याचे संरक्षण पुरवितांना अभिकर्त्यांच्या होणाऱ्या धकाधकीच्या जीवनात काही तर क्षण विरंगुळ्याचे यावे हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सहलीसह ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदरहु उपक्रमात प्रथमच अभिकर्त्यांना कुटुंबासह सहभागी करून घेण्यात आले होते. कौटुंबिक खेळ , निसर्ग पर्यटन, मोटिवेशनल सेमिनार तसेच व्यवसायाशी निगडित काही मार्गदर्शक सुचनांचे सत्र या निमित्ताने पार पडले.

सोबतच गाव पातळीवरील बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या वनभोजनाचा मनमुराद आस्वाद परिवारातील सदस्यांनी या वेळी घेतला.एव्हढेच नाही तर कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांनी बचत गटातील भगिनींच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.तदवतच या निमित्ताने थोडा फार का होईना त्यांच्या उद्योगाला अभिकर्त्यांचा हातभार लागला.
कार्यक्रमाची सांगता अभिकर्त्यांना (वृक्ष) रोपटे भेट देऊन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता कुरेवार ,अर्चना तिवारी , नागसेन टेंभुरकर अन्य अभिकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. वर्षभर केलेल्या आपल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक आपल्या कुटुंबियांसमोर व्हावे ही सर्वांचीच इच्छा ह्या निमित्ताने पूर्णत्वास गेली. अश्या विविध उपक्रमांचे आयोजन अधून मधून व्हावे अशी अपेक्षा अनेकांनी या वेळी व्यक्त केली.