Home Breaking News Chandrapur dist @news • 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिना निमित्त देशात सार्वजनिक...

Chandrapur dist @news • 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिना निमित्त देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी-बिरसा क्रांती दलची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

87

Chandrapur dist @news
• 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिना निमित्त देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी-बिरसा क्रांती दलची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: जागतिक आदिवासी दिना निमित्त 9 ऑगस्टला संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी काल बुधवार दि.9 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फत एक निवेदन देवून करण्यात आली .

चंद्रपूर शहरासह जागतिक आदिवासी दिन काल जिल्हाभर साजरा करण्यात आला.दुपारी बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी नगरसेवक अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना उपरोक्त मागणीचे एक लेखी निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळात प्रामुख्याने महिला जिल्हाध्यक्ष प्रिती मडावी,माया पेंदोर, धनराज कोवे, भोलेनाथ कोवे ,रेखा कुंभरे ,लता पोरेते,वर्षा आत्राम, वैशाली मेश्राम, वैशाली मेश्राम, महेन्द्र शेडमाके, मोनिका मडावी,निर्मला कुळमेथे, ओंकार गेडाम ,भैय्याजी ऊईके विजयसिंग मडावी, जगदीश कुंभरे, सुभाष कोवे ,कमलेश आत्राम दिवाकर मेश्राम आदिंचा समावेश होता.