Home Breaking News Chandrapur taluka@ news • ब्रिजभूषण पाझारे यांनी केली प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची पाहणी

Chandrapur taluka@ news • ब्रिजभूषण पाझारे यांनी केली प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची पाहणी

508

Chandrapur taluka@ news
• ब्रिजभूषण पाझारे यांनी केली प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची पाहणी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

नकोडा: चंद्रपूर तालुक्यातील मौजा नकोडा गावात जवळपास आठ हजार लोकांची वस्ती असून घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले लगतचे गाव आहे. तेथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारतीच्या छप्पराच्या प्लास्टरचा काही भाग खाली पडला दुर्दैवाने त्या खोलीत कोणीही नसल्याने त्यापासून कोणतीही हानी झाली नाही या घटनेची माहिती माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या कानावर येताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली व इमारतीच्या देखभालीसाठी तात्काळ दखल घेण्यात येईल असे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले
यावेळी नकोडा ग्रामपंचायत सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.पं सदस्य रजत तुरणकर, कंपा राजय्या, प्रभाकर लिंगमपेल्ली, डॅा.सिध्दिकी मॅडम प्रा.उपकेंद्र नकोडा , सुशीला राजगडकर प्रा. उपकेंद्र कर्मचारी उपस्थित होते.