Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस शहरात आदिवासी समाज बांधवांना सुधिरभाऊ मुनगंटीवार केंद्रा...

Ghugus city@ news • घुग्घुस शहरात आदिवासी समाज बांधवांना सुधिरभाऊ मुनगंटीवार केंद्रा तर्फे शीतपेय वाटप

439

Ghugus city@ news
• घुग्घुस शहरात आदिवासी समाज बांधवांना सुधिरभाऊ मुनगंटीवार केंद्रा तर्फे शीतपेय वाटप

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी आदिवासी समाज बांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले.

घुग्घुस येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अमराई वार्ड, गांधी चौक, जुना बसस्थानक, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे चौक मार्गे मार्गक्रमण करीत मिरवणुकीचे समापन करण्यात आले.

मिरवणुकीत मोठया संख्येत आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे, वैशाली ढवस, शरद गेडाम, विवेक तिवारी, सचिन कोंडावार, विनोद जंजर्ला, सिनू आडे, कोमल ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.