Home Breaking News Rajura taluka@ news • राजुरा- सास्ती मार्गावर एका पेट्रोल पंप समोर भीषण...

Rajura taluka@ news • राजुरा- सास्ती मार्गावर एका पेट्रोल पंप समोर भीषण अपघात ! • तिघांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी! • जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले !

2625

Rajura taluka@ news
• राजुरा- सास्ती मार्गावर एका पेट्रोल पंप समोर भीषण अपघात !
• तिघांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी!
• जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

राजूरा :सास्ती राजुरा मार्गाने येत असलेल्या धोपटला गावा जवळील झवेरी पेट्रोल पंप जवळ भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघांचा घटनासथळी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७: १० वाजताच्या सुमारास घडली .या दुदैवी घटनेतील मृतकांत निलेश वैद्य (३५) व त्यांची पत्नी रुपाली (३०) या शिवाय त्यांची ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे हे चंद्रपूर येथून आपल्या राहत्या घरी धोपटला कॉलोनी येथे जात असताना भरधाव वेगाने येत असणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने तीघांचा जागीच मृत्यू झाला तर काही अंतरावर सदरहू अज्ञात ट्रकने पुन्हा एका दुचाकी वाहनास धडक दिली. यात दोन गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारार्थ चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.