Nagpur city@ news
• नागपूरात “योगकक्षा”चे थाटात उद्घाटन!
• उमेश धोटे,ओमप्रकाश तिवारी,मायाताई कोसरे व मिना खोब्रागडेंची उपस्थिती!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
नागपूर:एसडीपीएल आश्रय कॅम्युनिटी हजारी पहाड येथे काल मंगळवार दि.१५ ऑगस्टला एसडीपीएल आश्रय हजारीपहाड नागपुरचे मुख्य पदाधिकारी उमेश धोटे व ओमप्रकाश तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत योगकक्षाचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटात व उत्साहात पार पडला.या वेळी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपले कार्य हे कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन या कार्यास आपला पाठिंबा असल्याचे उमेश धोटे व ओमप्रकाश तिवारी या वेळी आपल्या भाषणात म्हणाले. कार्यक्रमच्या आरंभी दिप प्रज्वलन करून राष्ट्रगीता द्वारे योगवर्गाला सुरुवात झाली.
आयोजित कार्यक्रमाला अनेक योगसाधकासह प्रिया सोनटक्के ,मीना पाबळे,सरीता कारीवाल,लता गोपाले,पुनम डांगरे ,श्रुती खोब्रागडे, मल्लेवारजी ,सुनिल कारीवाल आदीं मंडळींची उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना खोब्रागडे,नुर शेख,हर्षा मल्लेवार,रहीम शेख,सुरेंद्र चौव्हान आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
तिरंगा भारतीय अस्मितेचे प्रतीक- मायाताई कोसरे
तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नसून भारतीय अस्मितेचे एक प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला.असे मनोगत महाराष्ट्र पूर्व महिला पतंजलीच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे यांनी या कार्यक्रमा निमित्ताने बोलताना व्यक्त केले.भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,हर घर तिरंगा या अभियानाला सुरुवात केली असून या अभियानाच्या माध्यमातून सर्व शहिदांचे स्मरण करण्याची संधी देशवासियांना मिळाली आहे.स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहे.
स्वतःच्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पण केले. १९४७ साली जेंव्हा स्वातंत्र्यदिनी या तिरंगाचे ध्वजारोहण केले तेंव्हा पासुन या राष्ट्रध्वजाला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक वंदन करतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक दिवशी देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा आपण ही आजच्या दिनी संकल्प करु या . तद्वतच प्रत्येकांचे आरोग्य निरोगी राहील त्यामुळे त्यांचे कुटुंब सुखी राहील म्हणुन प्रत्येकाला योगप्राणायाम द्वारे निरोगी जीवन जगता येईल अशी आशा ही मायाताई कोसरे यांनी या वेळी व्यक्त केली.
