Home Breaking News Ballarpur city@ news • स्वातंत्र्यदिनी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने दिव्यांग बांधवास तीन...

Ballarpur city@ news • स्वातंत्र्यदिनी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने दिव्यांग बांधवास तीन चाकी सायकल भेट !

76

Ballarpur city@ news
• स्वातंत्र्यदिनी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने दिव्यांग बांधवास तीन चाकी सायकल भेट !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर:संभाजी ब्रिगेड शाखा बल्लारपूर ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. यंदा भारत देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२३ रोजी संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे येथील श्रीराम वार्ड स्मशानभूमी परिसरातील रहिवासी असलेला दिव्यांग बांधव प्रथम सुनील सागवणे याला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. यामुळे प्रथमला या स्वातंत्र्यदिनी एक नवीन स्वातंत्र्य मिळाल्याचे भाव त्याचे चेहऱ्यावर झळकले.
समाजातील गरजूंची गरज समजून त्यांच्याप्रती आपली सहानुभूती दाखवली . सदरहु कार्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहरातील संभाजी ब्रिगेडचे निखिल वडस्कर,रोहित चुटे,आमिर अहेमद,संकेत चौधरी,गणेश मसराम,साहिल घिवे,अंकुश पिंपळकर,प्रज्वल गौरकार,प्रतिक वाटेकर,मोहित अदमाने,संदीप सहारे,प्रनिल नवघरे आदीं उपस्थित होते.