Home Breaking News Chandrapur dist@ news • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य...

Chandrapur dist@ news • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य रुग्णांचे काय? राजू झोडेंचा सवाल • रुग्णांना तातडीने रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन छेडू झोडेंनी दिला प्रशासनाला इशारा !

135

Chandrapur dist@ news
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य रुग्णांचे काय? राजू झोडेंचा सवाल
• रुग्णांना तातडीने रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन छेडू झोडेंनी दिला प्रशासनाला इशारा !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपुर जिल्ह्यासह यवतमाळ, गडचिरोली तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.मात्र याच रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू असून अनेक मशीन बंद अवस्थेत पडल्या आहेत.तर स्ट्रेचर, व्हेंटिलेटर, औषध व डॉक्टरांचा मोठ्या तुटवडा रुग्णालयात असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नुकतेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे काल एका परिचरिकेला आपला जीव गमवावा लागला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे काय? असा सवाल देखिल राजू झोडे यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे.त्यामुळे रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.
अनेक भागातील गरीब आणि गरजू रुग्ण कमी खर्चात उपचार व्हावे यासाठी येथे भरती होत असतात. मात्र येथील रुग्णालयात योग्य उपचार सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसांना उपचार न मिळणे ही नित्याचीच बाब झाली असताना याच रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला आपला जीव गमवावा लागला.हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा एक पुरावा आहे. इतरांची काळजी घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका परिचारिकेला जीव गमवावा लागतो यासारखी दुसरी लाजिरवाणी घटना नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्याचे लक्ष नाही.वैद्यकीय अधिकारी कोणाचेच ऐकत नाही अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे. रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून, या घटनेची तातडीने आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, जिल्हा रुग्णालयात औषध साठा त्वरित उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.