Home Breaking News ◻️पाऊसपाणी🔸 🔸◻️ मृणाल कांबळे ☘️ सदस्य सहज सुचलं...

◻️पाऊसपाणी🔸 🔸◻️ मृणाल कांबळे ☘️ सदस्य सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ◻️🔸

138

🔸◻️पाऊसपाणी🔸

🔸◻️ मृणाल कांबळे ☘️
सदस्य सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ◻️🔸

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

♦️फोडातून पू रिसावा तसा
दरवर्षी तुंबलेली गटारं
हक्काच्या पावसासोबत
तूटून पडतात
झोपड्यांवर….

♦️एक वर्ग
कधी दुसऱ्या वर्गात
जातच नाही

उरातले काटे
उपसावे
तसे उपसावा लागतो गाळ
वाट्याला आलेला…

♦️ते येतात
समुद्रकाठाचा अंदाज घेत
भरल्या पोटानंतर
शतपावली करायला..

छतालाही सोसवत नाही मार
जमिनीवर सतत धार
मुलांबाळासह कवाड
बघत बसतात
पाणी ओसरण्याची वाट
दरहंगामी….

♦️पोसलेली विषमता
अंग सोडू मागत नाही..
चिकटलेली गचाडं
उडू पाहत नाही..

समतेचे गीत गात
दारी दरवेशी येतील
दारांवर फुली मारून जातील
सणासुदीला रेशनवर
तुप साखर देतील…

♦️हंगाम येताच
वसूलतील व्याजासह
तुझी किंमत…

पाऊस ओसरेलही..
तुझ्या झोपडीतून
तुझ्या जगण्यातला
रिसणारा पू
रिसत राहील..