Home Breaking News ⬜♦️अन्नदाता♦️⬜ ****** ♦️सौ.सविता संजय भोयर सहज सुचलं सदस्य राजुरा...

⬜♦️अन्नदाता♦️⬜ ****** ♦️सौ.सविता संजय भोयर सहज सुचलं सदस्य राजुरा जि. चंद्रपुर♦️

154

⬜♦️अन्नदाता♦️⬜
** *****************
♦️सौ.सविता संजय भोयर सहज सुचलं सदस्य राजुरा जि. चंद्रपुर♦️

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

खरा अन्नदाता जनतेचा राजा!
उपाशी राहून हाकतो कष्टाचा गाडा!
पोशींदा जगाचा शेतकरी माझा!
मालाला भाव नाही येतो सरकारचा आडा!!

कर्जाचा डोंगर निसर्गाचा कोप!
कुणीतरी सांगा आत्महत्येच कारण!
नापीकीचा रोग नशिबाला लागला!
शेतकरी दादाला माझ्या कसं नाही येईल बरं मरण!!

रडत जगतो रडत मरतो पावसाची आस करतो!
दूबार पेरणी तीबार पेरणी नक्षत्राची करणी!
ऊन वारा पाऊस अंगावर झेलतो!
ढगाकडे बघून म्हणतो मेघराजा
येतो तुझ्या शरणी!!

नांगराच्या तासावर चालून थकला!!
सावलीच्या शोधात तापत्या ऊन्हात!
घामाच्या अंगांत आयुष्य भिजत बसला!!
अंगार कर्जाची रास तळपत जीवघेणी मनात!!