Home Breaking News Ballarpur city@ news •बल्लारपुर शहरातील घटना गायला वाचवताना झालेल्या भीषण अपघाततील युवकाचा...

Ballarpur city@ news •बल्लारपुर शहरातील घटना गायला वाचवताना झालेल्या भीषण अपघाततील युवकाचा मृत्यू

288

Ballarpur city@ news
•बल्लारपुर शहरातील घटना गायला वाचवताना झालेल्या भीषण अपघाततील युवकाचा मृत्यू

✍️ग्यानिवंत गेडाम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर : शहरातील(बस्ती) कॉलरी दवाखान्या जवळ दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. गाय ला वाचवताना भीषण अपघात झाला. त्यात एक सिरीयस नागपुर दवाखान्यात असून दुसरा चंद्रपूर मेहरा दवाखान्यात आयसीयूमध्ये भरती होता.
त्या अपघातात गंभीर जखमी झालेले शहरातील सरदार पटेल वॉर्डातील राजशेखर पेरका हे नागपूरच्या दवाखान्यात जीवाशी झुंज देत असताना ती मावळली. तर अन्य वेकोलि कामगार प्रशांत आकुला हा चंद्रपूर च्या दवाखान्यात भरती होता तो गंभीर असून त्याला हैद्राबाद येथील यशोदा दवाखान्यात भरती केले आहेत.
राजशेखर पेरका याला दोन-तीन महिन्यात कॉलरी मध्ये नोकरी लागणार होती. त्याच्या एक भाऊ कोलकत्ता येथे कार्यरत असुन लहान भाऊ मायनिंग विषयात शिक्षण घेत आहे. मोठा मुलाच्या निधनाने त्यांच्या परिवारावर आघात पोहचले आहे.