Home Breaking News Chandrapur city@ news •यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम ! •चंद्रपूरच्या क्रिष्णा नगरला...

Chandrapur city@ news •यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम ! •चंद्रपूरच्या क्रिष्णा नगरला ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन! •आ.किशोर जोरगेवारांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन !

147

Chandrapur city@ news
•यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम !
•चंद्रपूरच्या क्रिष्णा नगरला ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन!
•आ.किशोर जोरगेवारांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणा-या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रिष्णा नगर येथे ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आज बुधवारी चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. एक महिना चालणा-या शिबिरासाठी शेकडों महिलांनी नोंदणी केली.
उद्घाटन कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंडारे, सायली येरणे, डाॅ. शर्मिला पोद्दार, ब्युटीशीयन गीता देवनाथ, सपना बारसागडे, किर्ती गुरुनुले, अशा देशमूख, कल्पना शिंदे, प्रतिभा नक्षीणे, रीना देवनाथ, मंजू सरकार, सविता चोखारे आदींची उपस्थिती होती.
आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात स्वयंरोजगार संबंधित विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. नुकतेच बाबुपेठ आणि दादमहल येथील ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. या शिबिरात जवळपास पाचशे महिला प्रशिक्षीत झाल्या आहे. प्रशिक्षीत सर्व महिलांना आमदार जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
दरम्यान आज आमदार जोरगेवार यांच्या हस्ते क्रिष्णा नगर येथील दुर्गा माता मंदिर समाज भवन येथे आयोजित ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण स्वयंमरोजगारा संदर्भातील महागडे प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाअंतर्गत जवळपास दोन हजार महिलांना आपण विविध प्रशिक्षण देत प्रशिक्षीत केले आहे.
आज क्रिष्णा नगर येथील प्रशिक्षण शिबिरात शेकडो महिला प्रशिक्षीत होणार आहे. या महिलांनी अवगत केलेला हा गुण स्वत:पूरता मर्यादित न ठेवता याचा उपयोग स्वयंरोजगारासाठी करावा असे आवाहनही यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व प्रशिक्षणार्थी महिलांची मोठ्या संख्येंने उपस्थिती होती. सदरहु ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरात हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी, डाय, फेशिअर, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदिं प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या जाणार आहे.