Home Breaking News Bhadravti taluka @news •वन प्राण्यांचा कायम बंदोबस्त करा •वन्य प्राणी पिडीत...

Bhadravti taluka @news •वन प्राण्यांचा कायम बंदोबस्त करा •वन्य प्राणी पिडीत शेतकऱ्यांची वनविभागा कडे मागणी

222

Bhadravti taluka @news
•वन प्राण्यांचा कायम बंदोबस्त करा

•वन्य प्राणी पिडीत शेतकऱ्यांची वनविभागा कडे मागणी

सुवर्ण भारत:मनोज मोडक
तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर

भद्रावती- चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असून भद्रावती तालुक्यातील शेजारील परिसरात जंगल आहे.जंगलातील वाघांचे वास्तव्य आमच्या गावात वाढले असून वाघाच्या भिती मुळे रात्रीला शेतात जागल करता येत नाही.म्हणून रानडुक्कर, रोही,सांबर,चितळ हे उपद्रवी वन्य प्राणी उभे पिक नष्ट करित आहेत.

तसेच वाघाच्या हल्ल्यात पाळीव जनावरां सोबत माणसे सुद्धा मारले जात आहेत. मजुर शेतात काम करण्यास भयभीत झाले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था होऊन शेतकरी हवालदिल झाला असून वन प्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यात यावा.याकरिता “शेतकरी संरक्षण समिती, चंद्रपूर” व “वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झालेले शेतकरी व शेतमजूर” यांनी श्री.हरिदास शेंडे वन परिक्षेत अधिकारी,भद्रावती यांच्या मार्फत विभागीय वन अधिकारी,वनविभाग ,चंद्रपूर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली .
हरिदास शेंडे, वन परिक्षेत अधिकारी,भद्रावती यांनी सदर विषयांवर शेतकरी संरक्षण समिती,चंद्रपूर सदस्य व सर्व पिडीत शेतकरीवर्ग यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा करून निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून न्याय मिळवून देईन असे आश्वासन दिले.
यावेळे विठ्ठल बदखल, गोपाल बोंडे ,विजय खंगार,विठ्ठल गारसे, भाऊराव कुटेमाटे,मुनेश्वर बदखल, बी.टी.पावडे,शंकर कुटेमाटे,पुरुषोत्तम आस्वले,विठोबा कुटेमाटे,प्रविण ठेंगणे नरेश काळे,पांडुरंग बोढाले, नामदेव पारखी,रामदास येरगुडे, विलास आगलावे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.