Home Breaking News Bhadrawati taluka@news •युवा सेनेच्या प्रयत्नांना यश •युवासेनेकडून आगार व्यवस्थापकांना...

Bhadrawati taluka@news •युवा सेनेच्या प्रयत्नांना यश •युवासेनेकडून आगार व्यवस्थापकांना दिलेल्या संपूर्ण निवेदनांना यश

187

Bhadrawati taluka@news

•युवा सेनेच्या प्रयत्नांना यश

•युवासेनेकडून आगार व्यवस्थापकांना दिलेल्या संपूर्ण निवेदनांना यश

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- कुचना गावासमोर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नागलोण या गावी थांबा असून सुद्धा तेथे एकही बस थांबवल्या जात नव्हती..
बस चालकाला सांगून सुद्धा तिथे बस थांबल्या जात नव्हती,
याचा गावकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवासासाठी खूप त्रास जात होता,
त्यामुळे त्यांनी शिवालय मध्यवर्ती कार्यालय येथे भेट दिली व त्यांच्या समस्या सांगितल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे व तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिक निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
तेव्हाच आगार व्यवस्थापकांनी तात्काळ नोटीस जाहीर करून नागलोणी या गावी बस सेवा सुरळीत केली.
यावेळी युवा सैनिक चेतन ढवस,सौरभ उरकुडे , सौरभ चिंचोलकर, आदित्य मडावी, चेतन बावणे,अनुप पावडे व नागलोन ग्रामवासी उपस्थित होते.