Home Breaking News Chandrapur city@ news • खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद व...

Chandrapur city@ news • खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक तातडीने लावा- अन्यथा जन आंदोलन उभारु महेश हजारेंचे चंद्रपूर जिल्हाधिका-यांना निवेदन

63

Chandrapur city@ news
• खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक तातडीने लावा- अन्यथा जन आंदोलन उभारु महेश हजारेंचे चंद्रपूर जिल्हाधिका-यांना निवेदन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर : जिल्ह्यातील बहुतांश सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्क सणद व दर पत्रक न लावल्यामुळे गरजेपेक्षा जास्त रुग्णांची लुटमार होत आहे. वाढीव बिल लावणे, जादा दर लावणे, औषधांची वाढीव बिल लावणे, विवीध तपासणीचे जास्तीचे दर लावने असे अनेक कारणे देत हाॅस्पीटल कडुन सातत्याने लुटमार होत असल्याचे दिसून येते.

प्रत्येक खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्ण हक्क सणद व दर पत्रक लावणे केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचे बंधनकारक धोरण असतानाही बहुतांशी रुग्णालयात याचे पालन केले जात नाही. ही वस्तुस्थिती आहे

प्रत्येक रुग्णाला हक्काची माहिती मिळावी व रुग्णालयातील लुटमार थांबावी म्हणून चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वच खाजगी व शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सनद व दर पत्रक लावणे बंधनकारक करावे, व ज्या रुग्णालयात रुग्ण हक्क सनद व दर पत्रक लावणार नाहीत अशा रुग्णालयाचा परवाना रद्द करावा

अन्यथा प्रहार स्टाईलने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रहारचे नेते महेश हजारे यांनी जिल्हाधिकारी यांना एका लेखी निवेदनातुन दिला आहे .निवेदन देतांना या वेळी विजय झुरमुरे ,सुनिल बंडीवार शुक्राचार्य मेश्राम, रामचंद्र घोंगडे विजय जगताप ,रामचंद्र ठोंबरे विश्वास जगताप, अतुल चतरंगे नारायण दहीवले, राजु नैताम नौषाद शेख, संजय बोढाले संजय गोंदाने,अशोक सिंग आदीं उपस्थित होते.