Home Breaking News Bhadrawati taluka@news • पोलिसांकडून जुगार खेळणारे 10 आरोपी अटकेत ...

Bhadrawati taluka@news • पोलिसांकडून जुगार खेळणारे 10 आरोपी अटकेत • लाखोंचा मुद्देमाल घेतला ताब्यात

216

Bhadrawati taluka@news

• पोलिसांकडून जुगार खेळणारे 10 आरोपी अटकेत

• लाखोंचा मुद्देमाल घेतला ताब्यात

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- गोपनीय माहितीच्या आधारे सुरु असलेल्या जुगारांवर धाड घालून जुगार खेळणारे दहा आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे शहरातील सुमठाना परिसरातील एका घरात करण्यात आली. या कारवाईत मोबाईल, मोटरसायकल व नगदी रकमेसह एकूण चार लक्ष 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या 10 आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमठाना परिसरातील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे दहा व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख 30हजार670 रुपये, आठ मोबाईल व पाच मोटरसायकली असा 4 लक्ष 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात अंमलदार शशांक, अनुप, विश्वनाथ, निकेश व योगेश आदींनी केली.