Home Breaking News Bramhpuri taluka@ news • भाजपा ब्रह्मपुरी तर्फे जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा यांचा शाल...

Bramhpuri taluka@ news • भाजपा ब्रह्मपुरी तर्फे जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार

106

Bramhpuri taluka@ news
• भाजपा ब्रह्मपुरी तर्फे जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार

सुवर्ण भारत:रवि चामलवार
तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी:बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांची भाजपा, जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झालेली आहे. या निवडीबद्दल कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अतिशय शांत, संयमी, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले उत्तम वक्ते, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, संघटनात्मक बाबतीत मजबूत पकड असणारे हरीश शर्मा यांचा ब्रह्मपुरी तालुका भाजपा पदाधिकारी यांचे कडून दिनांक 25 ऑगस्ट रोजी चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र पदाधिकारी चिंतन बैठकीचे औचित्य साधून हरिशजी शर्मा यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यामध्ये भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर दादा सातपुते,प्रा. रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो तथा अध्यक्ष संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रह्मपुरी तालुका, भाजपा युवा नेते साकेत भानारकर, सोशल मीडिया तालुका संयोजक धीरज पाल इत्यादींनी शुभेच्छा देऊन भावी वाटचालीसाठी शुभ चिंतीले.