Home Breaking News Ghugus city@ news •लाॅयड्स ग्राम काॅलनीत समृध्दी गटाचे कावड यात्रा

Ghugus city@ news •लाॅयड्स ग्राम काॅलनीत समृध्दी गटाचे कावड यात्रा

152

Ghugus city@ news
•लाॅयड्स ग्राम काॅलनीत समृध्दी गटाचे कावड यात्रा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी शिवजलाभिषेकासाठी कावड यात्रा काढण्यात आली होती, सर्व कॉलनीतील नागरिक शिवभक्तांना यात्रेत आले की व आपल्या परिवारासह सहभागी झाले. भगवान भोलेनाथांना जलाभिषेक करून पुण्य मिळेल व वढा गावातील तीन नदीच्या संगमावर जावुन लाइट्स ग्राम काॅलनीत व समृद्ध गट एकत्रित आले.
लाइट्स काॅलनीतील बालाजी मंदिरात सायंकाळी जलाभिषेक पूजा व आरती झाली,प्रसाद व अल्पोपाहार व्यवस्था करण्यात आली सर्व भक्ताने व परिसरातील नागरिकाने प्रसाद, अल्पोपाहाराच्या लाभ घेतला.

समृध्दी गटाचे सदस्य महेश तिवारी सांगितले कि आज सावन चा पहिला दिवस. शिवभक्तांच्या आवडत्या सावन महिन्याची सर्वात जास्त वाट पाहत असतात हे जाणून घेतले पाहिजे. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. या ऋतूत निसर्गही खूप आनंदी असतो. आषाढाच्या कडक उन्हानंतर पावसाचे थेंब जेव्हा पृथ्वीला भिजवतात तेव्हा तिला नवचैतन्य प्राप्त होते. आजूबाजूला हिरवळ दिसत असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी लॉयड्स ग्राम कॉलनीतील कावड यात्रा सदस्य प्रतिभा सिंह सोनल भास्कर,राधेश्याम गांधी, धनंजय सागुळले,मंगेश रणधीर चौधरी, विनोद पांडे व सर्व कॉलनी सदस्य उपस्थित होते.