Home Breaking News Bhadrawati taluka@news •विदर्भातील प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे. ...

Bhadrawati taluka@news •विदर्भातील प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे. 3 सप्टेंबर ला भद्रावतीत •विद्यार्थ्यांसह पालकांना करणार मोफत मार्गदर्शन

397

Bhadrawati taluka@news

•विदर्भातील प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे. 3 सप्टेंबर ला भद्रावतीत
•विद्यार्थ्यांसह पालकांना करणार मोफत मार्गदर्शन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – विदर्भातील प्रसिद्ध व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक नितेश कराळे 3 सप्टेंबर ला येत असुन विद्यार्थ्यी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
राजवंदन मंगल कार्यालय भद्रावती येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रम होणार असून रुरल ॲग्रिकल्चर युथ असोसिएशन (RAYA) या सामाजिक संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाला उद्घाटक आ.प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राया संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. जयसिंग चव्हाण उपस्थित राहतील. तसेच भद्रावती चे तहसीलदार अनिकेत सोनवने,भद्रावतीचे ठाणेदार बिपिन इंगळे,पंचायत समिती भद्रावती चे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
विदर्भातील प्रसिद्ध शिक्षक नितेश कराळे सर भद्रावती नगरीत प्रथमच येत असुन त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही आतुर झालेले आहेत.
कार्यक्रमास उपस्थित होणा-या विद्यार्थ्यीं व पालक तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून आगाऊ नोंदणी करून खबरदारी घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांना प्राधान्य अणुक्रमांक नुसार प्रवेश देण्यात येणार असून कार्यक्रमास येतांना विद्यार्थ्यांनी स्वतःचे ओळखपत्र जवळ ठेवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता नोंदणी करण्यासाठी राया संघटनेचे समन्वयक धीरज रायपुरे व सागर भेले यांच्याशी संपर्क करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यीं, पालक व शेतकरी वर्गाने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राया संघटने तर्फे करण्यात आले आहे.