Home Breaking News Rajura city@ news • राजुरा शहरात घरातच आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह...

Rajura city@ news • राजुरा शहरात घरातच आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह ! • राजूरा शहरात उडाली खळबळ

927

Rajura city@ news

• राजुरा शहरात घरातच आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह !
• राजूरा शहरात उडाली खळबळ

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

राजुरा: आज दुपारी अंदाजे ४:००वाजताच्या दरम्यान राजुरा शहरातील चेतन हॉटेलच्या बाजूला विधाते यांच्या घरी गळफास घेतलेल्या एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे राजूरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.मागील काही दिवसांपासुन विधाते यांच्या घरातून दुर्गंध वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्याकडून सातत्याने केली जात होती. त्या दुर्गंध वासेला कंटाळून सदरहु दुर्गंधी वास कुठून येत आहे याचा शोध शेजारच्या व्यक्तीने घेतला असता विधाते यांच्या घरी गळ फास घेऊन असलेला मृतदेह दिसून आला .सदरहु बाब त्यांनी तात्काळ राजुरा पोलिसांना कळविली. राजूरा पोलिसांनी सदरहू घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदन करीता रवाना केला असल्याचे वृत्त आहे.
मृताचे वर्णन असे दिसून आले अंगात पांढऱ्या रंगाचा बाही मुडपलेला शर्ट, काळ्या रंगाचा पॅन्ट, डाव्या हातावर “आई” असे इंग्रजीत शब्द कोरलेले आहेत सोबतच किंगचे चिन्ह गोदलेले आहे. शेजाऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार असे कळते कि विधाते यांच्या परिवारातील सर्व सदस्य गेल्या ५ महिन्यांपासून सदरहु घर सोडून दुसऱ्या घरी राहण्यास गेले. मागील ५ महिन्या पासून सदरहु घर हे बंद अवस्थेत आहे . या घरात कुणाचे येणे जाणे नाही असे बोलल्या जात आहे. उपरोक्त घटनेची पुढील चौकशी राजुराचे पोलीस निरीक्षक विशाल नगरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलिस पथक करीत असल्याचे समजते.