Home Breaking News Gadchandur taluka@ news • धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित तरुणाचा ...

Gadchandur taluka@ news • धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित तरुणाचा मृत्यू

257

Gadchandur taluka@ news

• धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित तरुणाचा मृत्यू

गडचांदुर : आंध्र प्रदेशातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका विवाहित तरुणाचा मृत्यू झाला .गडचांदूर बस स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली राकेश इंद्रजीत पटेल वय 27 वर्ष राहणार रीवा मध्य प्रदेश असे मृतांची नाव आहे विशेष म्हणजे पत्नी व त्यांचे दोन नातेवाईक याच बसमधून प्रवास करत होते .आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावरील वाहनावर राकेश पटेल हा चालक म्हणून कार्यरत होता . एक वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला तो खीर्डी येथे पत्नीसोबत किरायाच्या घरात राहत होता .तो आंध्र प्रदेश महामंडळाच्या बसमधून क्रमांक ए पी 29 .1543 बस क्रमांक पत्नी व दोन नातेवाईकासोबत गडचांदूर वरून चंद्रपूर कडे जात होता.

दरम्यान गडचांदूरच्या बस स्थानकापासून हिरादेवे यांच्या दवाखान्यासमोर त्यांनी धावत्या बसमधून अचानक उडी घेतली चालक व प्रवाशांनी त्याला त्याच बस मधून जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालय नेले . डॉक्टरांनी मृत घोषित केले . घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे पथकासह रुग्णालयात पोहोचले पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली. नंतर मूळ गावी पोहोचवण्याची व्यवस्था तसेच पैशाची मदत केली उपसरपंच दीपक खेकरे अरविंद बावणे यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलून केली .आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास गडचांदूर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.