Home Breaking News Ballarpur city@ news • बल्हारपूरच्या किल्ला व गांधी वार्डात विविध समस्या !...

Ballarpur city@ news • बल्हारपूरच्या किल्ला व गांधी वार्डात विविध समस्या ! •विराआंस युवा आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन सादर !

125

Ballarpur city@ news
• बल्हारपूरच्या किल्ला व गांधी वार्डात विविध समस्या ! •विराआंस युवा आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन सादर !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर: शहरातील काही वार्डात विविध समस्या निर्माण झाल्या असून विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी प्रभागातील स्थानिक नागरिकांना सोबत घेवून नगर परिषदचे मुख्याधिकारी यांची भेट घेतली व त्यांच्याशी या बाबतीत सविस्तर चर्चा केली .तसेच काही प्रभागातील समस्यांबाबत लेखी निवेदन सादर केले.

शहरातील किल्ला वार्ड व गांधी वार्ड येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नेमके कळत नाही. स्थानिक नगर सेवकाला वार्डवासियांनी माहीती देऊनही नगर सेवकाने या कडे दुर्लक्ष केले.या रस्त्यावरील खड्यांमुळे जेष्ठ नागरीकांना चालने अवघड झाले आहे. अनेकदा जेष्ठ नागरीकांचा खड्यांत तोल गेल्याने ते खाली पडले एव्हढेच नाही तर काहींना दुखापत देखिल झाली आहे. किल्ला वार्ड व गांधी वार्डात नव्या रस्त्याचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
सदरहु मागण्यांची पूर्तता न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समीती,युवा आघाडीच्या वतीने नगर परिषदेच्या विरोधात स्थानिक नागरीक व जेष्ठ नागरीकांना सोबत घेवून उपोषणाला बसु असा इशारा रोहीत लोनारे यांनी प्रशासनाला या वेळी दिला आहे‌.
निवेदन देतांना शहर अध्यक्ष रोहीत लोनारे, दिक्षांत जगताप, निश्चय जगताप, अमन कासोटे , श्रीकांत कांबळे, प्रनित गोरघाटे, साहिल करमरकर, मेघा कोल्हे, माया करमनकर, मंगला करमनकर, नमिता वाळके, सविता करमनकर,अपेक्षा गावंडे आदिं उपस्थीत होते.