Home Breaking News Rajura taluka@ news • राजू-यात बंदिस्त घरात आढळलेल्या “त्या “मृतकाची पटली...

Rajura taluka@ news • राजू-यात बंदिस्त घरात आढळलेल्या “त्या “मृतकाची पटली ओळख •पोलिस तपास जारी

503

Rajura taluka@ news
• राजू-यात बंदिस्त घरात आढळलेल्या “त्या “मृतकाची पटली ओळख
•पोलिस तपास जारी

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

३१ ऑगस्ट २३
राजुरा : येथील चेतन हाॅटेल शेजारी विधाते यांचा पडक्या घरात गळफास घेऊन मिळालेल्या इसमाची राजुरा पोलीसां कडुन पटली ओळख आहे सदरहु मृतकाची झडती घेतली असता मृतकाचा पॅन्टच्या खिशातून ओल्या व अस्पष्ट अवस्थेत आधार कार्ड मिळाले सदर आधार कार्ड वाचण्या योग्य नसल्याने आधार क्रमांकाची कशी -बशी ओळख करत आधार क्रमांकाने ऑनलाईन माहिती केली असता मृतकाचे नाव- विकेश गोविंदराव कोकाटे वय ३९ वर्ष राहणार- शिवकृष्ण धाम मानकापुर, नागपूर अशी ओळख समोर आली आहे.
मृतक इसम नागपूर येथून राजुरा शहरात कुठे व कुनाकडे आला हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. मृतक हा राजुरात किती दिवसांपासुन राहत होता कुनाच्या घरी आला किंवा कुणा व्यावसायिका कडे काम करण्या करीता आला होता का व तो विधाते यांच्या घरी पोहचला कसा आदि अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.सध्या या प्रकरणाची एकच चर्चा नागरीकात ऐकावयास मिळत आहे.

मृतकाचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणचे छायाचित्र व नागपूर ते राजुराशी संबंध पाहता हत्या कि आत्महत्या अशी शंका एकंदरीत व्यक्त केल्या जात आहे.
पुढील तपास राजुरा पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांचा निदर्शनात राजुरा पोलीस पथक करीत आहे.