Ballarpur city @news
• शांतता समितीच्या महत्वपूर्ण बैठकीला बोलविण्याचा बल्हारपूर पोलिस विभागास पडला पत्रकारांचा विसर!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
बल्लारपूर – अख्ख्या विदर्भात ओद्यौगिक परिसर म्हणून बल्हारपूर शहराची ओळख आहे.कायदा शांतता व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी ही ख-या अर्थाने पोलिस प्रशासनाची असते .गावात होणा-या विविध कार्यक्रमातील बंदोबस्तात प्रामुख्याने पोलिस विभागाची भूमिका महत्त्वाची असते.हे जरी खरे असले तरी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे वृत्तांकन करणारा पत्रकार देखिल हा समाजाचा एक मुख्य घटक आहे.पण अलिकडे बल्हारपूर पोलिसांना पत्रकारांचा विसर पडायला लागला की काय असे वाटू लागले आहे.आगामी होवू घातलेल्या विविध सणां
निमित्त शांतता समितीची एक बैठक बल्लारपूर पोलिस ठाण्यात नुकतीच शुक्रवार दि.०१ सप्टेंबरला पार पडली. या बैठकीला शहरातील गणमान्य नागरिक व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, व राजकीय नेते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.परंतू या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावलण्यात आले.या मागचे नेमके कारण काय हे मात्र कळू शकले नाही यंदा प्रथमच हा प्रकार बघावयास मिळाला.अनेकांनी या प्रकारा बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
पत्रकारांना या महत्वपूर्ण बैठकीत डावलने हा पोलिस प्रशासनाला पडलेला विसर कि जाणीवपूर्वक केलेली कृती असा प्रश्न सध्या बल्हारपूर नगरीत सर्वत्र चर्चिल्या जात आहे.
