Home Breaking News ◻️गुलाबाचा संदर्भ◻️ ♦️मृणाल...

◻️गुलाबाचा संदर्भ◻️ ♦️मृणाल राहुल ☘️ काव्यकुंज

107

◻️गुलाबाचा संदर्भ◻️

♦️मृणाल राहुल ☘️
काव्यकुंज

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

सहज सुचलं सदस्या
काट्याकडून गुलाबाचा संदर्भ घेईन म्हणते
या जगण्याला जरा अर्थ देईन म्हणते

हे उन्हाळे पावसाळे येतिल जातिलच
ह्या वेदनांचा उत्सव करेन म्हणते

का कुणास मागावे दान आनंदाचे
कंठातल्या हुंदक्यंना हूलकाव़ेन म्हणते

हा खेळ सावल्यांचा उन्हाशी सोयरीक त्याची
तुझ्या माझ्या नात्याची मैफल सजवेन म्हणते

हा हक्क म्हणा की मुजोरी म्हणा हवं तर
तुमच्याच मुखातून वाहवा मिळविन म्हणते