Home Breaking News Chandrapur city@ news • जिल्हा शिक्षक पुरस्काराने अविनाश घोनमोडे सन्मानित! •...

Chandrapur city@ news • जिल्हा शिक्षक पुरस्काराने अविनाश घोनमोडे सन्मानित! • सपत्निक झाला चंद्रपूरात सत्कार !

217

Chandrapur city@ news
• जिल्हा शिक्षक पुरस्काराने अविनाश घोनमोडे सन्मानित!
• सपत्निक झाला चंद्रपूरात सत्कार !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत २०२३-२४ करीता जिल्हा शिक्षक पुरस्कार घोषित झाले असून सदरहु पुरस्कारासाठी मूल तालुक्यातील जुनासूर्ला येथील अविनाश नागनाथ घोनमोडे यांची निवड झाली आहे.आज मंगळवार दि.५ सप्टेंबरला स्थानिक दादासाहेब कन्नमवार सभागृहात सपत्निक त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

अविनाश घोनमोडे हे पंचायत समितीच्या जिबगाव केंद्रातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लोंढोली येथे विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेली १७ वर्षांपासून शिक्षक पदाची जबाबदारी सांभाळीत आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो. एव्हढेच नाही तर त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम देखील राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळेत विज्ञान प्रदर्शनही भरविले आहे. या शिवाय शैक्षणिक विषयक अनेक स्पर्धेचे आयोजन त्यांनी केलेले आहे. विद्यार्थी प्रिय अशी तालुक्यात ख्याती असलेले जुनासूर्ला येथील अविनाश घोनमोडे हे गावातील विकासासाठी नेहमीच प्रयत्नशिल असतात.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.