Home Breaking News Ballarpur city@ news • राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण! • बल्लारपूर...

Ballarpur city@ news • राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण! • बल्लारपूर मनसे महिला कडुन रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

131

Ballarpur city@ news
• राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण!
• बल्लारपूर मनसे महिला कडुन रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

सुवर्ण भारत: संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर:- बहिन भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन बहिन भावाला राखी बांधत स्वतःच्या रक्षणाचे वचण घेत असते याच पवित्र सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा बल्लारपूर मनसे महिला सेनेने बल्लारपूर पोलीस दलात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. जीवाची व परीवाराची पर्वा न करता बल्लारपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार उमेश पाटील व सहकारी पोलीस बांधव चोवीस तास आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात दिवसेंदिवस महिलांवर होणारे मानसीक तथा शारीरीक अत्याचार हे नष्ट होऊन महिलांना स्वातंत्रपणे फिरता यावे त्या सुरक्षीत राहावे आपले कार्य अधिकाअधिक प्रबळ व्हावे.

यासाठी मनसे महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधून वचनबद्ध केले कोरोणा काळात देखील पोलीस बांधवांनी जनसामान्यांचे रक्षण केले असेच कार्य आपल्याकडून घडत राहावे या निस्वार्थ भावणेणी बल्लारपुर महिला सेनेनी बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार यांच्या उपस्थितीत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला या वेळेस बल्लारपूर शहराध्यक्षा मंगला घडसे, पूजा खोब्रागडे, लक्ष्मी ठाकूर, सपना ब्रामने, संगीता चंद्रगिरी तथा महिला उपस्थीत होत्या.