Home Breaking News Bhadravti taluka@ news • जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथे शिक्षक...

Bhadravti taluka@ news • जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथे शिक्षक दिन साजरा !

184

Bhadravti taluka@ news
• जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथे शिक्षक दिन साजरा !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती:शिक्षकांचा सन्मान व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी देश येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याच दिनी मुख्याध्यापकांच्या भूमिकेत पार्थ कडूकर यांनी कार्य पार पाडले तर शिक्षकांचा भूमिकेत अनुष्का पाचभाई, लक्ष्मी खुटेमाटे, विजया कावडे, तनश्री झाडे, तेजस्विनी मालेकर, मंगेश भोंगळे, सुरज नांदे, वेदश्री बोबडे, सोमेश्वरी खुटेमाटे, खुशी नवघरे, भाविका खुटेमाटे, चैताली कडूकर, नताशा राऊत, श्री उईके यांनी अध्यापनाचे कार्य पार पाडले. परिचराच्या भूमिकेत अजिंक्य क्षीरसागर यांनी काम केले.

आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पाचभाईने केले तर मुख्याध्यापक संजय मासळकर यांनी प्रास्ताविक भाषण केले, अनिल भगत यांनी या वेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.शशिकांत रामटेके यांनी आभार मानले .पार पडलेल्या शिक्षकदिन कार्यक्रमाला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा कलावती कोडापे,कृष्णा दर्वि व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.सदरहु कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधना उपगणलावार , शिवानी काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.