Home Breaking News Bramhpuri taluka@ news • चोरीच्या गुन्हातील आरोपी २४ तासाच्या आत गजाआड! ...

Bramhpuri taluka@ news • चोरीच्या गुन्हातील आरोपी २४ तासाच्या आत गजाआड! • ब्रम्हपूरी पोलिसांची यशस्वी कामगिरी!

116

Bramhpuri taluka@ news
• चोरीच्या गुन्हातील आरोपी २४ तासाच्या आत गजाआड!

• ब्रम्हपूरी पोलिसांची यशस्वी कामगिरी!

✍️रवि चामलवार
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी (चंद्रपूर)शहरातील सावजी हॉस्पिटल मागे रहिवाशी असणाऱ्या शालू प्रधान यांच्या घरी दिनांक ७ सप्टेंबरला घरी कोणी नसताना याच संधीचा फायदा घेत आरोपी नामे अमोल हांडेकर वय:- वर्ष:- २७ , राह.येणोरी (माल) ता. नागभिड याने घरात प्रवेश केला.
यात आरोपीने घरातील
१) ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र किंमत रुपये ९०,०००/- ,
२) १२ ग्रॅम वजनाची मंगळसुत्र, दोन डोरले व सोन्याचे मनी किंमत रुपये ४०,०००/-
३) ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत रुपये २५०००/-
४) ५ ग्रॅम वजनाचे १ जोडी कानातले झुमके किंमत रुपये १५०००/-
असे एकूण ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने (त्याची एकूण किंमत रुपये १,५५,०००/-रुपये )चा मुद्देमाल लंपास केला होता .पोलिसांनी चोरीस गेलेला सर्व माल आरोपी कडून जप्त केलेला आहे.
सदरहु आरोपीला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असून त्याच्यावर अपराध क्रमांक ४४७/२०२३ अन्वये भांदवी कलम ४५४,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काल दिनांक ८सप्टेंबरला पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांचा पीसीआर दिला आहे .
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे करीत आहेत.