“संवाद मनामनाचा”
एक अभिनव उपक्रम!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:शासन दप्तराविना शाळा या उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शाळेत काही वर्षांपासून राबवित आहे. त्याच उपक्रमांतर्गत पंचायत समिती मुल मधील गडीसुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थी कट्टा आयोजित करुन”संवाद मनामनाचा” हा एक अभिनव कार्यक्रम राबविला आहेत. या कार्यक्रमातून शाळेतील विद्यार्थिनी कु.श्रावणी मोहूर्ले ही इयत्ता सातव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी प्रत्येक महिन्याला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या मान्यवरांची मुलाखत घेत त्यांचेशी थेट संवाद साधणार आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सुरवातीला ऑटोग्राफ घेतला जातो.
नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात लक्ष्मण खोब्रागडे तसेच वृंदा पगडपल्लीवार या दोन नवोदित कवींची मुलाखत तिने आपल्या सुरेख शैलीत घेवून सर्वांना अचंबित केले.अनेकांनी तिचे कौतुक देखिल केले .शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टिकले यांनी उपक्रमाबद्दल सांगताना म्हणाले की शाळेत अश्या विविध उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शनीवारला केल्या जाते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.
त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या हेतूने असे उपक्रम घेतले जातात. अशा विविध उपक्रमातूनच विद्यार्थीही घडत असतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सुरेश टिकले ,चौधरी अविनाश श्रीगुरवार , विजय दुधे, शीतल धकाते, स्मिता सायरे तसेच नवनीत कंदालवार यांचे योगदान मोलाचे ठरले.
