Home Breaking News Chandrapur dist@ news • मराठा आरक्षणाविरोधात येत्या 17 सप्टेंबरला उतरणार तेली समाज...

Chandrapur dist@ news • मराठा आरक्षणाविरोधात येत्या 17 सप्टेंबरला उतरणार तेली समाज रस्त्यावर! • ओबीसीच्या महामोर्चात होणार सहभागी !

142

Chandrapur dist@ news
• मराठा आरक्षणाविरोधात येत्या 17 सप्टेंबरला उतरणार तेली समाज रस्त्यावर!
• ओबीसीच्या महामोर्चात होणार सहभागी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत १७ सप्टेंबरला स्थानिक गांधी चौक येथून निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात तेली समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज चंद्रपूरात पार पडलेल्या एका बैठकीतून केले आहे. स्व. खा.बाळू धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची एक आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी शेकडों तेली समाज बांधव उपस्थित झाले होते.

या बैठकीत तेली समाजाचे नेते प्रा. सुर्यकांत खनके यांनी सांगितले की, मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. त्या मुळे तेली समाज हा रस्त्यावर उतरून सरकारचा तीव्र विरोध करणार आहे.

या वेळी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्रजी बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
येत्या १७ सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात संपूर्ण तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल.असा निर्णय एकमताने सर्व पदाधिकाऱ्यांनी या वेळी घेतला

बैठकीत तेली समाजाच्या मागण्यांवर देखिल सविस्तर चर्चा करण्यात आली.