Home Breaking News Chimur taluka@ news • तंटामुक्तीचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश कामडी यांनी कार्यभार स्वीकारला!

Chimur taluka@ news • तंटामुक्तीचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश कामडी यांनी कार्यभार स्वीकारला!

134

Chimur taluka@ news
• तंटामुक्तीचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश कामडी यांनी कार्यभार स्वीकारला!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

नेरी (चिमूर ) : चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी येथील मूळ रहिवाशी असलेले सुरेश कामडी यांची नेरी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली असून त्यांनी नुकताच तत्कालीन अध्यक्ष हरिदास चांदेकर यांच्या कडुन या समितीचा कार्यभार स्वीकारला आहे.

कामडी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक जेष्ठ नामवंत नाट्य कलावंत असून ते सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत.या पूर्वी सुध्दा सुरेश कामडी यांनी नेरी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पद भूषविले आहे.त्या कालावधीत त्यांनी अनेक प्रलंबित प्रकरणांचा अल्पकालावधीत निपटारा केला होता.त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांच्या या समितीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता.अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या नेरी या गावात सदैव शांतता नांदावी त्या दिशेने आपण प्रयत्न करणार असल्याचे ते या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.दरम्यान सुरेश कामडी यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरावरुन स्वागत होवू लागले आहे.विदर्भातील अनेक मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.