• भिसीत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा !
• विद्यार्थ्यांनी लुटला दहिहंडी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
भिसी : येथील श्री साई कॉन्व्हेन्ट व जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि. ९ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
दहिहंडी कार्यक्रमात मुला व मुलींचे गृप सहभागी झाले होते.उल्लेखनिय बाब म्हणजे मुलींच्या पथकाने तीन थर लावून दहिहंडी फोडली.
विशेष आकर्षण म्हणून नर्सरी ते के. जी. २ च्या विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभुषा परिधान करून कार्यक्रम स्थळी उपस्थितीतांचे लक्ष वेधुन घेतले होते .सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
