Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात युवक कांग्रेसची भव्य जनसंवाद यात्रा...

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात युवक कांग्रेसची भव्य जनसंवाद यात्रा ! • अनेकांशी साधला संवाद

192

Ballarpur city@ news

• बल्लारपुर शहरात युवक कांग्रेसची भव्य जनसंवाद यात्रा !
• अनेकांशी साधला संवाद !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

बल्लारपुर: कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या यशाने भारावलेल्या कॉंग्रेस पक्षाने आता जनतेशी संवाद साधण्याच्या कार्यक्रम आखला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार बल्लारपुर शहरात माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवक कांग्रेस पूर्व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात वस्ती विभाग युको बॅंक-महात्मा गांधी पुतळ्या पासून-गोलपुलिया-इतवारी बाजार पर्यंत बल्लारपुर युवक कांग्रेस तर्फे जनसंवाद यात्रा काढन्यात आली. शहरातील अनेक नागरिक व्यापारी व बाजारात आलेल्या लोकांशी कांग्रेस पक्षांच्या पदाधिका-यांनी संवाद साधला. दरम्यान या वेळी केंद्र व राज्य सरकारच्याही जनविरोधी धोरणांवर जनतेशी संवाद साधण्यात आला . महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार,महीलांवरील अत्याचार,शेतक-यां वरील अन्याय यासह स्थानिक मुद्यांवरही जनसंवाद यात्रेत नेत्यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी दुर्गेश चौबे, स्वप्निल तिवारी,शफाक शेख एन.एस.यु.आई जिल्हा अध्यक्ष,जिल्हा महासचिव शंकर महाकाली,जिल्हा महासचिव स्नेहल चालूरकर,विधानसभा अध्यक्ष जुन्नैद सिद्दीकी,उपाध्यक्ष अजय रेड्डी,शहर उपाध्यक्ष राजेश केशकर,प्रतीक तिवारी,दानिश शेख,पूर्व गट नेता देवेंद्र आर्या,पवन मेश्राम,विनोद आत्राम,छाया मड़ावी,शोभा महतो, जीशान सिद्दीकी,विवेक कुटेमाटे,रवि गड्डमवार,आकाश दुर्गे, गोपाल कलवला,अकरम शेख,प्रांजल बालपांडे, सुनील मोतीलाल,कैलाश धानोरकर,चंचल मून,संदीप नक्षीने,बशीर सिद्दीकी,श्रीकांत गुजरकर,पितेश बोरकर,संजु सुददला, नितिन मोहरे, मास, मुरली व्यवहारे,रमेश राय,रोशन ढेगळे,रोहित सक्सेना, शाहबाज खान,रोहित पठान, दीपक भास्कर, अक्षय आरेकर,अमोल काकड़े,आफताब पठान आशिक मुद्देवार, सूरज ठाकुर, वसीम खान, आदिल सिद्दीकी, नेहाल शेख, दानिश पठान, प्रतिनिक रामटेके, मुन्नू भाई, पवन चौहान,रवि वासाडे,तुषार निषाद,युवराज मोहरे यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्तागण जनसंवाद यात्रेत सहभागी झाले होते.