Home Breaking News Chandrapur dist@ news • मराठा समाजाला कुणबी जातीच प्रमाणपत्र देण्यास कुणबी महासंघाचा...

Chandrapur dist@ news • मराठा समाजाला कुणबी जातीच प्रमाणपत्र देण्यास कुणबी महासंघाचा विरोध

80

Chandrapur dist@ news
• मराठा समाजाला कुणबी जातीच प्रमाणपत्र देण्यास कुणबी महासंघाचा विरोध

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये.त्या (मराठा) समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही.अन्यथा कुणबी ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन आज एका शिष्टमंडळाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, व ना. देवेंद्र फडणवीस यांना चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यां मार्फत देण्यात आले. कुणबी महासंघाचे महासचिव दलित मित्र आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी सांगितले.

1990 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारने ओबीसीना केंद्रात 27 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के आरक्षण दिले. परंतु त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ओबीसी समाज आरक्षणापासून वंचितच राहिला. अशातच मराठ्यांचे पुढारी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्या मुळे कुणबी व ओबीसी समाजात कमालीचा असंतोष उफाळून आलेला आहे. या देशाच्या विकासात कुणबी व ओबीसी समाजाचा सिंहाचा वाटा आहे परंतु सरकार कुणबी ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून आपली पोळी शेकण्याचा कट रचत आहे याला ओबीसी समाजाने बळी पडू नये असे आवाहन देखील आरीकर यांनी केले आहे.