Home Breaking News Chandrapur city@ news • विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा – आ. किशोर...

Chandrapur city@ news • विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा – आ. किशोर जोरगेवार •चंद्रपूरच्या सदरदार पटेल महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार

46

Chandrapur city@ news
• विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा – आ. किशोर जोरगेवार
•चंद्रपूरच्या सदरदार पटेल महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:शिक्षणामुळे आयुष्यात सकारात्मक विचारांचा संचार होतो. नकारात्मक विचार दूर होतात. शिक्षण ही विकासाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उच्च शिक्षित होऊन या प्रक्रियेचा भाग बना, महाविद्यालयीन जिवन तुमच्या आयुष्यातील सुर्वण काळ आहे. याचा उपयोग योग्य करत विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सरदार पटेल महाविद्यालय गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, प्राचार्य डॉ. पी. एस. काटकर, सदस्य दिनेश पटेल, उपप्राचार्य माधव शेट्टीवार, सांस्कृतिक प्रमुख सुमेधा श्रीरामे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे आमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. तुमचे वय स्वप्न बघण्याचा आहे, परंतु हे स्वप्न पुर्णत्वास नेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. महाविद्यालयीन जिवन आयुष्यातला सर्वात सुंदर काळ आहे. हा काळ उत्तम भाविष्य घडविण्यात घालवा, आपण 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी आहात येथुन तुमच्या जिवनाची पुढची दिशा ठरणार आहे. आयुष्याला यश्वस्वी वळण मिळेल असे नियोजन आपण यावेळी केले पाहिजे असे ते म्हणाले.

गरीब, गरजु विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही विविध उपक्रम सुरु केले आहे. मतदार संघात 11 अभ्यासिकांचे आपण निर्माण करत आहोत. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना निःशुल्क अभ्यास करता येणार आहे. आज येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार केला गेला आहे. आपण शिक्षणात मिळविलेल्या यशाची ही पावती आहे. या सत्कार सोहळ्यातुन नवी ऊर्जा घेऊन उंच शिखर गाठा असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.