Home Breaking News Varora taluka@ news • वरोरा येथील जय भारतीय चौकात तान्हा पोळा उत्साहात...

Varora taluka@ news • वरोरा येथील जय भारतीय चौकात तान्हा पोळा उत्साहात साजरा

144

Varora taluka@ news
• वरोरा येथील जय भारतीय चौकात तान्हा पोळा उत्साहात साजरा

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा – भारतीय सोशल फाउंडेशन तथा रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने येथील जय भारतीय चौकात तान्ह्य पोळा निमित्ताने नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात बालगोपाळांची लगबग होती. हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. नंदी बैल सजावट स्पर्धेत परिसरातील जवळपास २५० बाल गोपाळ सुंदर वेशभूषेत, नंदीला सजवून उपस्थित होते.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद ठक , सागर कोयाळवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेत वेदांशी बुरटकर हिने प्रथम ,आधिराज डोंगरावर याने द्वितीय तर देवांशी तांदुळकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. क्रमशः प्रथम, द्वितीय, तृतीय विजेता स्पर्धकांना सायकल, टेबल, स्कुल बॅग मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेत विशेष प्रोत्साहन पुरस्कार वरद डोंगरावर व राजवीर शर्मा यांना देण्यात आला.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, लहान मुले व पालकांची गर्दी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.सागर वझे, रोटरीयन नितेश जयस्वाल, योगेश डोंगरवार, पवन भुजाडे, अमित नाहर, राम लोया, जोगी , हिरालाल बघेले, एड.मधुकर फुलझेले, मनोज कोहळे, जय भारती सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.