Home Breaking News Bhadravti taluka@ news •चंदनखेडा येथे तान्हा पोळा नंदीबैल सजावट स्पर्धा संपन्न...

Bhadravti taluka@ news •चंदनखेडा येथे तान्हा पोळा नंदीबैल सजावट स्पर्धा संपन्न •महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांचा उपक्रम

98

Bhadravti taluka@ news
•चंदनखेडा येथे तान्हा पोळा नंदीबैल सजावट स्पर्धा संपन्न
•महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांचा उपक्रम

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती: तालुक्यातील चंदनखेडा येथे खास तान्हा पोळा सणाचे औचित्य साधीत बालगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांच्या वतीने तान्हा पोळा नंदीबैल सजावट स्पर्धा दि. १५ सप्टेंबरला चंदनखेडा येथील बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत प्रथम बक्षिस निखिल सुधाकर दोडके ,व्दितीय बक्षिस ओमकार प्रमोद राखुंडे तर तृतीय पारितोषिक नितेश बाबाराव घुघुसकर यांना प्राप्त झाले. महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडुन विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विपीन इंगळे, उप-पोलिस निरिक्षक अमोल कोल्हे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवंते, सरपंच नयन जांभुळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. नंदी बैल सजावट स्पर्धांकांना शौर्य क्रिडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्याकडून शैक्षणिक साहित्यांसह प्रोत्साहन पर साहित्य देण्यात आले.

यावेळी शौर्य क्रिडा मंडळाचे आशिष हनवते, अमित नन्नावरे,शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, राहुल चौधरी, मंगेश हनवते, गणेश हनवते,दिलीप ठावरी, देवानंद दोडके,शंकर दडमल ,भुपेश निमजे, पंकज दडमल, प्रविण भरडे , सिंगलदिप पेन्दाम, दिलिप कुळसंगे, प्रकाश भरडे, संकेत बुरेवार, अमोल महागमकार, प्रज्वल बोढे, शंकर दडमल,भुपेश बोढे, स्वप्निल दडमल, यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आशिष हनवते यांनी केले तर प्रास्ताविक मनोहर हनवते यांनी केले .उपस्थितीतांचे आभार शुभम भोस्कर यांनी मानले.