Home Breaking News Mul taluka @news •डोनी येथे एका इसमाचा खून! •आरोपीस केली पोलिसांनी...

Mul taluka @news •डोनी येथे एका इसमाचा खून! •आरोपीस केली पोलिसांनी अटक!

449

Mul taluka @news
•डोनी येथे एका इसमाचा खून!
•आरोपीस केली पोलिसांनी अटक!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मूल(चंद्रपूर):शेतीच्या जुन्या वादातून दुपट्टयाने गळा आवळून एका इसमाचा खून केल्याची घटना डोनी येथे पोळ्याच्या दिवशी अंदाजे रात्री आठ वाजता घडली. या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी आरोपीस अटक केल्याचे वृत्त आहे. ऐन पोळ्याच्या दिवशी उपरोक्त घटना घडल्याने डोनी येथे एकच खळबळ उडाली होती.सदरहु घटनेतील मृतकाचे नाव अमृत बाजीराव अलाम असून त्याचे वय 60 वर्षे असल्याचे सांगितल्या जाते.आरोपीचे नाव विजयपाल गोंविदराव अलाम असून त्याचे वय अवघ्या 25 वर्षाचे असल्याचे समजते.
डोनी येथे अलाम कुटुंब राहत असतात.

अमृत अलाम आणि विजयपाल अलाम या दोघांमध्ये गत दोन वर्षांपासून शेतीचा जुना वाद होता. हे दोघेही नातेसंबंधात आहेत. सद्या त्यांच्या शेतीत धानाचे पीक घेतले आहे. गुरूवारला (बैलपोळ्याच्या )दिवशी समाज मंदिराजवळ विजयपालने अमृत सोबत शेतीचा जुना वाद उकरून काढला.

वचपा काढण्याच्या उद्देशाने रागाच्या भरात पांढ-या रंगाच्या दुपट्याने अमृतचे पाठीमागे दोन्ही हात बांधले. त्याच दुपट्टयाने गळा आवळून त्यास ठार मारले. या घटनेचे वृत्त गावात वा-यासारखे पसरले.कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मृतक हा समाज मंदिराच्या पायरी जवळ टेकून पडलेला आढळला. दुपट्याने गळा आवळून खून केल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले असल्याचे कळते. या प्रकरणी मृतकाची पत्नी अन्नपूर्णाबाई अलाम हीने मूल पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदविली .त्यावरून पोलिसांनी आरोपी विजयपाल गोंविदराव अलाम,रा.डोनी यांस अटक केली आहे.त्याच्यावर भांदविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहे.