Ballarpur city @news
•कुर्ला बल्लारशाह ट्रेन सुरु करण्याची अजय दुबे केली मागणी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपूर :-कुर्ला बल्लारशाह ट्रेन सुरु करण्याची मागणी अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली यांनी रेल्वे मंत्री ला भेटून केले.
केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी सफदरजंग, नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि कुर्ला बल्लारशाह ट्रेन दररोज, काझीपेठ पुणे ट्रेन आठवड्यातून तीन दिवस करणे, नागपूर रेल्वे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांचा लवकर विकास करणे इत्यादी मागण्या सादर केल्या. मंत्री महोदयांनी सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अजय दुबे यांनी सांगितले.
