Home Breaking News Ballarpur city@ news • राज्यस्तरीय अष्टाडू आखाडा क्रीडा स्पर्धेतच्या चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या...

Ballarpur city@ news • राज्यस्तरीय अष्टाडू आखाडा क्रीडा स्पर्धेतच्या चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या समता सैनिक आखाडाच्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार

42

Ballarpur city@ news
• राज्यस्तरीय अष्टाडू आखाडा क्रीडा स्पर्धेतच्या चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या समता सैनिक आखाडाच्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- महाराष्ट्र शासनाने शिवकालीन शस्त्र -अस्त्र युद्धकला हे कालबाह्य होऊ नये याकरिता आखाड्यांना राष्ट्रीय क्रीडा खेळामध्ये समाविष्ट करून घेतले. या कलेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन अमरावतीला करण्यात आले आहे. त्याकरिता बल्लारपूरच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम मध्ये निवड चाचणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये समता सैनिक आखाडा विद्यानगर वार्ड बल्लारपूरचे आठ खेळाडू चे प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली. कु नुपुर पिंपळे, नंदिनी वाळके , अनामिका करमनकर, कार्तिक रामटेके, अरिहंत शेंडे, प्रीतम वनकर, स्वप्निल घुसे, राहुल शेडमाके या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपरिषद बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गांधी निराधार समिती बल्लारपूरचे अध्यक्ष समीर केने , राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, माजी नगरसेवक अरुण वाघमारे, बल्लारपूरचे कवी संजय लोहकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय युथ टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन भारतीय युथ टायगर संघटनेचे सल्लागार ॲड.पवन मेश्राम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता समता सैनिक आखाड्याचे संचालक प्रफुल झांमरे, रामू भैया, दीक्षांत झांमरे, दर्शन मोरे, रतन फुलकर,सुरज चौबे, मनोज बालमवार, समीर खान, सद्दाम अंसारी आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.