Home Breaking News Bhadrawati taluka@news • शिंदे महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर…

Bhadrawati taluka@news • शिंदे महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर…

187

Bhadrawati taluka@news
• शिंदे महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर…

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्रतिनिधि,भद्रावती

भद्रावती : – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर च्या वतीने तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला. ते भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यास्तरावर करणार आहेत.

तालुका क्रीडा संकुल येथे
आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा पावसामुळे रद्द झाल्या. नंतर यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर स्पर्धा घेण्यात आल्या. १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या संघाने स्व. यमुनाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चोरा च्या संघाचा पराभव करत तालुकास्तरावर आपला विजय संपादित केला.
आता यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हा स्तरावर भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे तसेच प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण , माधव केंद्रे आणि समस्त प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे श्रेय प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक रमेश चव्हाण यांना दिले .