Home Breaking News Chandrapur dist@ news • आ. किशोर जोरगेवारांनी नोंदविला माझी माती माझा देश...

Chandrapur dist@ news • आ. किशोर जोरगेवारांनी नोंदविला माझी माती माझा देश अभियानात सहभाग

88

Chandrapur dist@ news
• आ. किशोर जोरगेवारांनी नोंदविला माझी माती माझा देश अभियानात सहभाग

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान आज शनिवारी चंद्रपूरात सदरहु यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अमृत कलश मध्ये सपत्नीक माती आणि तांदुळ अर्पण करुन यात्रेत आपला सहभाग नोंदविला आहे.

आपल्या देशाच्या मातृभूमी विषयीची कायम कृतज्ञता आणि विरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ अभियान दि. 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु करण्यात आले आहे. त्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज चंद्रपूर शहरातून सदरहु यात्रेला सुरुवात झाली.

यावेळी सदरहु यात्रा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचली नंतर आमदार जोरगेवार यांनी सपत्नीक सदर अमृत कलश मध्ये माती आणि तांदुळ अर्पण केले. या कलशातील मातीचा वापर दिल्ली येथे महान शुरविरांच्या स्मरनार्थ तयार करण्यात आलेल्या अमृत वाटीकेत केला जाणार आहे.

‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी केली जात आहे. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात, घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत करण्याचे पवित्र काम केले जात आहे. हे अभियान राष्ट्राचे गौरव वाढविणारे असल्याची भावना आमदार जोरगेवार यांनी या वेळी व्यक्त केली.